मग ठाकरे आणि नार्वेकरांच्या चौकशीचीही मागणी करा; संजू परबांचे प्रत्युत्तर
सावंतवाडी
आमदार दीपक केसरकर हे देवभक्त आहेत. एखादे मंदिर दिसल्यानंतर ते कुठेही थांबतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ राजकारणासाठी त्यांची नाहक बदनामी शिवसेनेच्या रुपेश राऊळ यांनी करू नये, असे प्रतिउत्तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे दिली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी कॅप्टन खरातला पाणी दिले. त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर यांचे त्यांच्याशी थेट कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यामुळे आपल्या नेत्यांवर त्यांनी बोलावे. उद्याच्या मोर्चात त्यांच्या चौकशीची मागणी करावी, असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला. ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आल्यानंतर श्री. परब यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टीळवे, उत्कर्षा गावकर, युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते. ते म्हणाले, या ठिकाणी राऊळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार दीपक केसरकर यांना नाहक बदनाम करण्याचे कारस्थान रचले आहे. मुळात आमदार दीपक केसरकर हे देवभक्त आहेत. एखादे मंदिर दिल्यानंतर किंवा देव दिसल्यानंतर ते कुठेही थांबतात. ही वस्तुस्थिती आहे, असे असताना कोणाच्या कपाळावर तो आरोपी आहे, असे लिहिलेले नसते. त्यामुळे कोण आला? कोण गेला? हे कळू शकत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत चोर साबीत करत नाहीत तोपर्यंत त्याला चोर म्हणता येणे योग्य नाही. त्यामुळे राऊळ यांनी टीका करण्यापेक्षा तुमच्या पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खरात यांच्याशी संबंध आहेत. हे उघड करावेत, उद्या होणाऱ्या मोर्चात त्यांचीही चौकशी करा, अशी मागणी करावी. संपलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या नेत्यांवर नाहक टीका करू नये, असे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका केली होती. याबाबत त्यांना विचारले असता ज्यांना १६ मते पडली आणि त्यांचा पराभव झाला अशावर आपण बोलणार नाही. तब्बल दोन वेळा त्यांचे डिपॉझिट जप झाले अशा माणसावर काय बोलावे, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
konkansamwad 
