पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियात भव्य स्वागत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियात भव्य स्वागत.

नवीदिल्ली.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी मॉस्कोला पोहोचले आहेत.विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांना विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान मोदी लवकरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
   पुतीन आज रात्री मॉस्कोबाहेर पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ एका खासगी डिनरचे आयोजन करणार आहेत. कॉटेजमध्ये रात्रीच्या जेवणाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या पाच वर्षांतील मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा असून तिसऱ्या कार्यकाळातील त्यांचा पहिलाच परराष्ट्र दौरा आहे. याआधी 2019 मध्ये पंतप्रधान मोदी रशियाला गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी व्लादिवोस्तोक येथे एका आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर पोहोचले आहेत. रशियाचा दौरा संपवून मोदी ऑस्ट्रियाला रवाना होतील. आपल्या दौऱ्याबद्दल माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, येत्या तीन दिवसांत रशिया येथे आयोजित 22व्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तसेच माझ्या पहिल्याच ऑस्ट्रिया भेटीसाठी मी रवाना होत आहे.
   उर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर देवाण घेवाण या क्षेत्रांसह इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि रशिया या देशांदरम्यान असलेल्या विशेष आणि विशेषाधिकारसहित धोरणात्मक भागीदारीने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत मोठी प्रगती केली आहे. ते म्हणाले होते की, माझे मित्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह या द्विपक्षीय भागीदारीच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांबाबतचे दृष्टीकोन सामायिक करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. शांत आणि स्थिर प्रदेश घडवण्यासाठी आम्ही आश्वासक भूमिका निभावू इच्छितो. या दौऱ्यामुळे मला रशियातील उत्साही भारतीय समुदायाला भेटण्याची संधी देखील मिळणार आहे.