रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची रत्नागिरी दाभोळे जि.प.गटामध्ये प्रचार सभा.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची रत्नागिरी दाभोळे जि.प.गटामध्ये प्रचार सभा.

रत्नागिरी.

   राजापूर विधानसभा मतदार संघातील दाभोळे जि.प.गटामध्ये पार पडलेल्या मेळाव्याला शिवसैनिकांसह स्थानिक जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत यांना पाठींबा जाहिर केला.सदर प्रचार सभा खा.विनायक राउत,आमदार डॉ. राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला असुन सदर प्रचार सभेमध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांनी विकास कामांचा आढावा देत पुढील पाच वर्षात शिवसेना यापेक्षाही अधिक चांगली विकासात्मक कामगिरी करुन अधिक लोकाभिमुख होईल असा आत्मविश्वास व्यक्त करत खासदार विनायक राउत लक्षणीय मताधिक्यांनी विजयी होतील असे प्रतिपादन केले.
    सदर प्रचार सभेला आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी व जनतेने मोठी उपस्थिती दर्शवली होती.प्रचार सभेमध्ये उमेदवार विनायक राउत यांनी देशाच्या हितासाठी व संरक्षणासाठी केंद्रामध्ये इंडिया आघाडी येणे जरुरीचे असल्याने महाविकास आघाडी एकत्र आली असल्याचे वक्तव्य केले.त्याप्रसंगी लोकसभा संपर्क महिला आघाडी नेहा माने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा महिला संघटक वेदा फडके, माजी आमदार सुभाष बने, क्षेत्रप्रमुख जयसिंग माने, रत्नागिरी-दक्षिण जिल्हा समन्वयक रवि डोळस, राजापूर विभासभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, तालुकाप्रमुख नंदादिप बोरुकर, तालुका युवाधिकारी केतन दुधाणे, उपतालुकाप्रमुख शेखर कोलते, विभागप्रमुख मनोहर सुकम, जिप सदस्य रजनी चिंगळे, उपविभागप्रमुख दत्ता घुमे, दत्ताजी कदम, बापू शिंदे, कृष्णा सकपाळ, मंगेश दळवी, कमलेश म्हावळणकर, संजय कांबळे, प्रविण जोशी, ओंकार सुर्वे, योजना लोटणकर आदी सर्व आजी माजी पदाधिकारी व सर्व शिवसैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.