आनंदवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

वेंगुर्ला.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, वेंगुर्ला तालुका व शहर समिती, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला, दलित समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती उत्सव सोहळा दि.११ ते १५ एप्रिलपर्यंत आनंदवाडी येथे साजरा केला जाणार आहे.
यानिमित्ताने दि.११ रोजी स. ११.०० वा. महात्मा ज्योतिबा फुले जयंती, स.११.०० ते २.०० वा. आरोग्य शिबिर (माधवबाग शाखा- कुडाळ).दि.१२ रोजी दु.३ वा.चित्रकला स्पर्धा, सायं. ६ वा. बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा, मुलांच्या विविध स्पर्धा, दि. १३ रोजी सायं. ४ वा. महिलांच्या विविध स्पर्धा, दि.१४ रोजी स.९.३० वा. पंचशील ध्वजारोहण व भिमवंदना, स.१० वा. मुलांची भाषणे, ११.३० वा.आनंदवाडी ते साई दरबार हॉलपर्यंत मोटर सायकल रॅली, दु.१२ वा. डॉ.सौ.मानसी सातार्डेकर व डॉ.सौ.वसुधा मोरे यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन. दु. ३ वा.डॉ. जयेंद्र परुळेकर, जयंती उत्सव समिती अध्यक्ष विठ्ठल जाधव, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा वेंगुर्ला अध्यक्ष प्रेमानंद जाधव, दलित सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास जाधव, सावित्रीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुहानी जाधव यांच्या उपस्थितीत जाहीर अभिवादन सभा, सायं. ५.३० वा. साई दरबार हॉल ते दाभोली नाका ते बाजारपेठ - कॅम्प मार्गे आनंदवाडीपर्यंत सामाजिक ऐक्य व सद्भावना मिरवणूक, दि.१५ रोजी सायं ७. वा. आनंदवाडी येथे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.