परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. प्राजक्ता पाटकर यांची बिनविरोध निवड
वेंगुर्ला
परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. प्राजक्ता प्रसाद पाटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.उपसरपंच संजय दूधवडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी प्राजक्ता पाटकर यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी पार पाडली.निवडीच्या वेळी माजी सभापती निलेश सामंत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सौ. प्राजक्ता पाटकर यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष वसंत तांडेल, वेंगुर्ला खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, सरपंच प्रणिती आंबडपालकर, सदस्य प्रदीप प्रभू, संजय दूधवडकर, अभय परुळेकर, तन्वी दूधवडकर, नमिता परुळेकर, सीमा सावंत, रश्मी सामंत, सुनाद राऊळ यांच्यासह माजी सरपंच पुरुषोत्तम प्रभू, सदस्य सुनील चव्हाण, बाळकृष्ण परुळेकर, भालचंद्र सारंग, शांताराम पेडणेकर, दामोदर पाटकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
konkansamwad 
