आंबोलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत गव्याचा मृत्यू.....वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

आंबोलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत गव्याचा मृत्यू.....वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर


आंबोली


        येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका गव्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना स्थानिक रहिवासी ओंकार अशोक गावडे यांच्या घराच्या आसपास घडली.  
        या अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत मृत गव्याचा पंचनामा केला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.आंबोली घाट परिसर हा वन्यजीवांसाठी महत्त्वाचा अधिवास मानला जातो. मात्र, भरधाव वाहनांमुळे सातत्याने वन्यप्राण्यांचे बळी जात असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहनचालकांनी घाट परिसरात वेगमर्यादा पाळावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.