एम.सी.सी. सावंतवाडी संघ ठरला जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा मानकरी
सावंतवाडी
निरवडे येथील नॅशनल स्कूल'मध्ये आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एम.सी.सी. सावंतवाडी संघाने विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात उत्कृष्ट ताळमेळ आणि अचूक स्मॅशिंगचे प्रदर्शन करत एम.सी.सी. सावंतवाडीच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी जय मानसीश्वर संघाला पराभवाचा धक्का दिला.अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात अंतिम गुणाची कमाई करताच एम.सी.सी. संघाने मैदानावर एकच जल्लोष केला. संस्थेचे अध्यक्ष शेखर जैन यांच्या हस्ते या विजेत्या संघाला भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. एम.सी.सी. सावंतवाडीच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
konkansamwad 
