कणकवलीत ठाकरे सेनेला मोठा धक्का......२८ वर्षांचा निष्ठावान सचिन सावंत समर्थकांसह भाजपमध्ये
कणकवली
ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आणि कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओम गणेश या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.सलग २८ वर्षे ठाकरे सेनेत सक्रिय असलेल्या सावंत यांच्या या निर्णयामुळे कणकवली तालुक्यात ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.सचिन सावंत यांच्यासोबत कसवनचे माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, हळवलचे माजी उपसरपंच विष्णू ठाकूर, सतीश सापळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद गांवकर, विलास सावंत, सखाराम घाडीगांवकर, प्रकाश मेस्त्री, सुरेश गुरव, वैभव शेट्ये, सत्यवान मेस्त्री, अजित मेस्त्री, दिलीप ठाकूर, राज सावंत, मंगेश राजाध्यक्ष आणि उमेश मेस्त्री यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.या सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शीतल दळवी, संदीप गावडे, सतीश सावंत, हर्षदा वाळके, सोनू सावंत, समीर नलावडे, संदीप सावंत, मिलिंद सर्पे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
konkansamwad 
