शिवसेना विधानसभा बीएलए प्रमुखपदी परीक्षित मांजरेकर यांची नियुक्ती

शिवसेना विधानसभा बीएलए प्रमुखपदी परीक्षित मांजरेकर यांची नियुक्ती

सावंतवाडी

 

   शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना 'बीएलए' (बूथ लेव्हल एजंट) प्रमुख पदी परीक्षित मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार करण्यात आली आहे. जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांच्याकडे आता या तिन्ही तालुक्यांच्या विधानसभा मतदारसंघातील बूथ स्तरावरील नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.मांजरेकर यांच्या निवडीचे वृत्त समजताच राजकीय आणि सामाजिक स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्ष संघटनेतील त्यांचा अनुभव आणि जनसंपर्क पाहता, आगामी काळात मतदारसंघातील बूथ यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.