भाजपकडून सावंतवाडी नगरपरिषदेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर
सावंतवाडी
सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा सावंत-भोसले यांचा समावेश आहे. तर याच प्रक्रियेत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक उदय नाईक, समृद्धी विर्नोडकर, आनंद नेवगी, राजू बेग, दिपाली भालेकर हे पाच माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहे तर प्रतिक उर्फ सिताराम बांदेकर, रुजूल पाटणकर, गोपाळ नाईक, मेहशर शेख या नव्या दमाच्या उमेदवारांना भाजपने संधी दिली आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये दिपाली भालेकर, राजू बेग तर प्रभाग दोन मध्ये सुनीता पेडणेकर, प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर, प्रभाग तीन मध्ये शर्वरी मडगावकर, मोतीराम उर्फ आनंद नेवगी, प्रभाग क्रमांक चार मध्ये मेहशर शेख, गोपाळ नाईक, प्रभाग क्रमांक पाच मध्ये दुलारी रांगणेकर, सुधीर आडिवरेकर, प्रभाग क्रमांक सहा मध्ये मेघा डुबळे व अजित गवंडळकर तर प्रभाग क्रमांक सात मध्ये समृद्धी विर्नोडकर, उदय नाईक, प्रभाग क्रमांक आठ मध्ये सुकन्या टोपले, सिताराम बांदेकर, प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नीलम नाईक व रुजूल पाटणकर, प्रभाग क्रमांक दहा मध्ये विणा जाधव व अनिल निरवडेकर यांचा समावेश आहे.

konkansamwad 
