रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात सामाजिक उपक्रम......नगराध्यक्ष राजन गिरप यांच्याकडून चार गरजवंतांना आर्थिक मदत

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात सामाजिक उपक्रम......नगराध्यक्ष राजन गिरप यांच्याकडून चार गरजवंतांना आर्थिक मदत

 


वेंगुर्ले

 

     वेंगुर्ले शहरातून एक सामाजिक बांधिलकी जपणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा करण्याचा वेगळा पायंडा वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी पाडला आहे. हार तुरे आणि सत्कार समारंभापेक्षा थेट गरजवंताच्या दारात जाऊन मदत करण्याचा उपक्रम त्यांनी भाजपाच्या माध्यमातून राबविला. यासाठी वेंगुर्ले शहरातील अशी चार कुटुंबे निवडण्यात आली ज्यांच्याकडे खरोखरच उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. यामध्ये आजाराने त्रस्त असलेले खालची गावडेवाडी येथील अशोक गजानन गिरकर, अंध व अपंग असलेले नाना मसुरकर, कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याचे साधन नसलेल्या आणि दोन अविवाहित मुलांना मानसिक आजार असल्याने अत्यंत कठीण परिस्थितीत अनाथाश्रमात राहणाऱ्या बेबी कासकर आणि परबवाडा मासुरा येथील रोझालीन फर्नांडिस ज्यांचे कुटुंबाचा आधार असलेले पती अल्बर्ट फर्नांडिस हे माडावरून पडून मृत्यू पावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती अशा चारही गरजवंतांना त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, सदानंद गिरप, प्रितम सावंत, सुधीर पालयेकर, नगरसेविका आकांक्षा परब, काजल कुबल, रिया केरकर, शितल आंगचेकर, भाजपा शहर शक्ती केंद्र प्रमुख किरण कुबल, पदाधिकारी मनवेल फर्नांडिस, साई भोई यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.