राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सावंतवाडीत मुक आंदोलन.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सावंतवाडीत मुक आंदोलन.

सावंतवाडी.

   शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद  सावंतवाडी येथे अर्चना घारे यांच्या कार्यालयात घेण्यात आली.गेली अनेक वर्ष पवार साहेबांनी ज्यांना मोठे केले त्यांनीच भाजपच्या साथीने पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.पक्ष व चिन्ह काढून घेतले आहे.पण त्यांना याचे उत्तर जनताच देईल. आम्ही आता जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहोत.अशी माहिती शरद पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी यावेळी दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाबद्दल सावंतवाडीत मुक आंदोलन करण्यात आले.
    लोकशाही सोडून आता हुकुमशाहीकडे मोदी सरकारची वाटचाल सुरु आहे.पक्षाचे चिन्ह याला आमच्या मते दुय्यम महत्त्व असून आमच्या साठी विचार महत्त्वाचे आहेत. हुकुमशाही व अराजकता माजविण्याचे काम हे सरकार करत आहे. आमचा जनतेवर व नियतीवर विश्वास आहे. नियती कोणाला सोडत नाही असे सामंत यावेळी म्हणाले.मंत्री दीपक केसरकर हे आपण आपली प्रॉपर्टी विकून राजकारण केल्याचे सांगत आहेत. केसरकर यांनी वडिलोपार्जित जमीन विकली की ते आमदार झाल्यानंतर त्यांनी मिळवलेले प्रॉपर्टी विकली, याचा त्यांनी खुलासा करावा. त्यांच्या जमिनी बाबत सावंत यांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरु आहे,अशी माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली. केसरकर हे कधी खरे बोलत नाहीत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी किती विकास कामे केली ते सांगावे व जाहीर केलेली कोणती कामे पूर्ण झाली ते दाखवावे, असेही भोसले यावेळी म्हणाले.नाव आणि चिन्ह गेल तरी शरद पवार आमच्याकडे आहेत. त्यांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. निवडणूक आयोग अदृश्य शक्तीन विकत घेतलेला आहे. पण,आम्ही शरद पवार यांच्या सोबत आहोत. साहेब सोबत असल्याने आम्ही कशालाही घाबरत नाही. आगामी काळात शरद पवार काय आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. मर्सिडीज गाडीच नाव आणि लोगो चोरला तरी गाडी तशीच आहे. तो दर्जा इतरांना येणार नाही असे विधान कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केले.
  यावेळी प्रसाद रेगे, भास्कर परब, पुंडलिक दळवी, देवा टेंमकर, सचिन पाटकर, हिदायतुल्ला खान, योगेश कुबल, सावली पाटकर,अॅड. सायली दुभाषी, सुधा सावंत, सुमित भाईप, श्रावणी कोरगावकर, संजय भाईप, सुहास कुडाळकर, सलीम नाबर,तैसीफ आगा, इलियास आगा, लालू पटेल, सागर पालकर,वैभव परब, अवधूत मराठे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.