आमदार नितेश राणे करणार कार सेवकांचा सत्कार. अयोध्येला जावून सेवा केलेल्या कार सेवकांचा होणार राम मूर्तीची सुवर्ण प्रतिकृती व सुवर्ण राम पादुका आणि अयोध्या राम मंदिर प्रतिकृती देवून सन्मान.

आमदार नितेश राणे करणार कार सेवकांचा सत्कार.   अयोध्येला जावून सेवा केलेल्या कार सेवकांचा होणार राम मूर्तीची सुवर्ण प्रतिकृती व सुवर्ण राम पादुका आणि अयोध्या राम मंदिर प्रतिकृती देवून सन्मान.

कणकवली
     कणकवलीत आम.नितेश राणे यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी महाआरती आणि कार सेवकांचा सत्कार होणार आहे. यावेळी कार सेवकांना अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती आणि  राम, सिता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तीची सुवर्ण प्रतिकृती व सुवर्ण राम पादुका भेट देऊन सत्कार केला जाणार आहे.
     यावेळी गीत रामायण मधील
"मंगल भवन अमंगल हारी
द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी.."
"रघुकुल रीत सदा चली आई
प्राण जाए पर वचन न जाई.."
राम सिया राम
सिया राम जय जय राम....! असे कोरलेले श्लोकही या मूर्तींसोबत भेट दिले जाणार आहेत.
 
      २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे हा सत्कार सोहळ्याचा भव्य कार्यक्रम होणार आहे. १९९२ साली अयोध्येला जावून कार सेवा केलेल्या कार सेवकांचा हा सन्मान होणार आहे.