उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर, असा असेल दौरा कार्यक्रम

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  सिंधुदुर्ग दौऱ्यावर, असा असेल दौरा कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी

 

    उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे 
       बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड देवगडकडे प्रयाण, सकाळी 10.45 वाजता डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांचे जागेवरील हेलिपॅड, ता. देवगड येथे आगमन व मोटारीने कुणकेश्वर मंदिर देवगडकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता कुणकेश्वर मंदिर येथे दर्शन व राखीव, सकाळी 11.30 वाजता मोटारीने माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 11.45 वाजता रविंद्र फाटक यांच्या निवासस्थान येथे राखीव, दुपारी 12.15 वाजता मोटारीने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड देवगडकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड देवगड येथे आगमन व हेलिकॉप्टरने आंगणेवाडी मालवणकडे प्रयाण, दुपारी 12.45 वाजता आंगणेवाडी येथे आगमन व मोटारीने भराडीदेवी मंदिराकडे प्रयाण, दुपारी 1 वाजता भराडीदेवी मंदिर येथे दर्शन व राखीव, दुपारी 1.30 वाजता मोटारीने आंगणेवाडी मालवणकडे प्रयाण, दुपारी 1.45 वाजता आंगणेवाडी हेलिपॅड मालवण येथे आगमन व हेलिकॉप्टर ने चिपी विमानतळ वेंगुर्लाकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व शासकीय विमाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.