पक्ष प्रवेशानंतर परशुराम उपरकर यांचे बांदा येथे भव्य स्वागत

पक्ष प्रवेशानंतर परशुराम उपरकर यांचे बांदा येथे भव्य स्वागत


सावंतवाडी   
        उबाठा शिवसेनाप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी मातोश्री येथे शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. तब्बल बारा वर्षानंतर उपरकर हे स्वगृही परतले. आज उपरकर यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे शिवसैनिक आणि उपरकर समर्थक यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत उपरकर यांचे स्वागत करण्यात आले व आमचा जुना वाघ बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक पुन्हा परतला असे गौरवोद्गार शिवसैनिकांद्वारे काढण्यात आले.
           यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, तालुका संघटक मायकल डिसोजा, बांदा शहर प्रमुख साई काणेकर, बांदा विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर येडवे, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष रियाज खान, आरोस माजी विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक, शाखाप्रमुख गुरुनाथ रामकृष्ण नाईक तसेच आशिष सुभेदार, विनोद सांडव, नाना सावंत, बाळा बहिरे, मंदार नाईक, बाबल गावडे, दीपक गावडे राजाराम चीपकर, सुरेंद्र कोठावळे, आप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, सचिन मयेकर, रामचंद्र ठाकूर, विनायक गावडे, नंदू परब, प्रवीण आरोसकर, प्रवीण गवस, सागर पटेकर, भैय्या कोल्हे, प्रशांत पेडणेकर, मंदार सुभेदार, सुनील नाईक, संदेश सावंत, शशिकांत आहिर, प्रणित तळकर, मनोज कांबळी, रोहित मुळीक, ओंकार गावडे, विजय गावडे, प्रशांत पेडणेकर, दुलाजी चौकेकर, दिनेश कदम, पास्कल रॉड्रिक्स, नवनाथ झोरे, हर्षद परब, राजेश परब आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.