आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी मधुकर जाधव, उपाध्यक्षपदी गौतम जाधव यांची निवड.

वेंगुर्ला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची सभा आनंदवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे जयंती उत्सव समिती माजी अध्यक्ष विठ्ठल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत सन- २०२५ ते २०२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.यावेळी आनंदवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वेंगुर्ला अध्यक्षपदी मधुकर जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. उर्वरित उत्सव समिती कार्यकारिणीत उपाध्यक्ष - गौतम जाधव, ज्योत्स्ना जाधव, सचिव - अमोल जाधव, सहसचिव - संदीप जाधव, खजिनदार - विकास जाधव, सहखजिनदार- जयंत जाधव, कार्याध्यक्ष - विठ्ठल जाधव, सल्लागार - वामन कांबळे, लाडू जाधव, वाय.जी.कदम, आर.के.जाधव व इतर बाकी सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली.यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची रुपरेषा ठरवण्यात आली.यावेळी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई तालुका वेंगुर्ला अध्यक्ष प्रेमानंद जाधव, दलित समाजसेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्षा सुहानी जाधव, तसेच आनंदवाडीतील धम्म बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.