सावंतवाडी आजगाव येथील वेतोबा मंदिराचा १८ मे ला वर्धापन दिन

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा वर्धापन दिन १८ मे ला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात सकाळी ६.२५ वाजता अभिषेक, लघुरुद्र व आरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता पालखी व रात्री ठीक ८.३० वाजता "मानी मराठा" नाटकाचे आयोजन करण्यात आले. तरीही या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळी व आजगाव ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.