जनता आरोग्य दरबाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सावंतवाडीत महत्त्वाची बैठक

जनता आरोग्य दरबाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सावंतवाडीत महत्त्वाची बैठक

 

सिंधुदुर्गनगरी

 

    जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी २९ एप्रिलला सावंतवाडीत "जनता आरोग्य दरबार" भरवण्यात येणार आहे. या मोठ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आणि नियोजनासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व संस्था आणि संघटनांची एक विशेष बैठक शनिवार, १८ एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक कळसुलकर हायस्कूलमधील भवानी मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता पार पडेल. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने या बैठकीचे आयोजन केले आहे. या आरोग्य दरबारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे नियोजन नीट व्हावे आणि तालुक्यातील जास्तीत जास्त संस्था व मंडळांनी यात सहभाग घ्यावा, या उद्देशाने ही बैठक होत आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, सर्व सामाजिक संघटना, मंडळे आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीचे एन.बी. रेडकर आणि राजू केळुसकर यांनी केले आहे.