माडखोल व्हि.पी.कॉलेज ऑफ फार्मसी येथे साकारण्यात आला ५५ फुटी शिवफलक.

सावंतवाडी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवजयंती हि मोठ्या उत्साहाने साजरी झाली प्रत्येकजण आपल्या परीने शिवाजी महाराजांना मानवंदना देताना आपल्याला दिसले. असेच एक शिव फलक सावंतवाडी माडखोल मधील एका फार्मसी कॉलेज मध्ये पाहायला मिळाले. येथील व्हि.पी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शिवजयंती निमित्त ५५ फुटीचा शिव फलक साकारण्यात आला, हा शिव फलक विशेष आकर्षण ठरताना दिसला. या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपनिरीक्षक अमित गोते उपस्थित होते.महाविद्यालयातील शिवराज्य व्यवस्थापक कमिटीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सिंधुदुर्ग किल्ला ते माडखोल पर्यंत शिवज्योत आणणे, पालखी सोहळा, सिंहगर्जना ढोल ताशा पथक कणकवली आणि विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, शिवअभिषेक, शिवमुर्ती पूजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, अरूण पाटील, डॉ. संदेश सोमनाचे, दिप्ती फडते आदी उपस्थित होते.