लिनेस क्लब, वेंगुर्ला आयोजित मॅट रांगोळी प्रशिक्षणास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लिनेस क्लब, वेंगुर्ला आयोजित मॅट रांगोळी प्रशिक्षणास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

वेंगुर्ला

 

        वेंगुर्ला बॅ. खर्डेकर रोड येथील श्रीम. शिला हर्षद गावडे यांच्या  निवासस्थानी वेंगुर्ला लिनेस क्लब तर्फे ॲड. सुषमा प्रभू खानोलकर यांनी मॅट रांगोळी प्रशिक्षण आयोजित केले होते. उमा इन्स्टिट्यूट, चिपळूणच्या संचालिका सौ. उमा म्हाडदळकर यांनी या मॅट रांगोळीचे प्रशिक्षण दिले.सौ. म्हाडदळकर यांचा परिचय लिनेस सुषमा प्रभू खानोलकर यांनी करुन दिला व त्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.यावेळी लिनेस क्लब अध्यक्षा सौ. पल्लवी कामत, कॅबिनेट ऑफिसर लिनेस उर्मिला सावंत, लिनेस हेमा गावस्कर, लिनेस मंदाकिनी सामंत, लिनेस अंजली धुरी, लिनेस मृण्मयी केरकर उपस्थित होत्या. यावेळी सौ. म्हाडदळकर म्हणाल्या की, ज्यांच्या अंगी अंगभूत कौशल्य आहे त्यांना आज व्यवसायात वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग आपल्या अर्थार्जनासाठी केला पाहिजे. व वेगवेगळी कला कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत.ॲड, सुषमा प्रभू खानोलकर यांनी सांगितले की, यापूर्वी सुद्धा वेंगुर्ला शहरात आम्ही उमा म्हाडदळकर यांचे फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण, नववारी साडी शिवणे, कापसापासून हार बनविणे वगैरे प्रशिक्षण दिले होते. त्याचा लाभ वेंगुर्ला तालुक्यातील हजारो महिलांनी घेतलेला आहे. यानंतर लिनेस हेमा गावस्कर यांनी म्हाडदळकर व श्रीम. शिला गावडे यांचे आभार मानले. या प्रशिक्षणाचा वेंगुर्ला शहरातील ५० महिलांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. रावळ मॅडम, स्मिता वागळे, मधुरा आठलेकर, मयुरी केरकर, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. वृंदा गवंडळकर, सौ. आकांक्षा परब, सौ. साक्षी पेडणेकर, सौ. कृपा मोंडकर, सौ. प्रार्थना हळदणकर उपस्थित होत्या.