देवगड पडेल येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवगड
देवगड येथील पडेल ग्रामपंचायत सरपंच भुषण पोकळे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून २ दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये महिला दिनाच्या पूर्व संध्येला ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता होम मिनिस्टर, रात्री ९ वाजता पालकमंत्री नितेश राणे व पडेल मंडल अध्यक्ष बंड्या (महेश) नारकर यांच्या माध्यमातून भव्य LED स्क्रीन वर मोफत छावा सिनेमा चा शो दाखवण्यात येणार असून दि. ८ मार्च रोजी जागतिक महिलादिन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे त्यामध्ये १ ली ते ४ थी, ५ वी ते ७ वी, ८ वी व ९ वी यांच्यासाठी निबंध स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, खो खो स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, सर्वांसाठी खाऊ गल्ली कार्यक्रम, महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या वेळी पडेल गावचे सरपंच भुषण पोकळे, उप सरपंच विश्वनाथ पडेलकर व सर्व ग्रा.प.सदस्य व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.