साटेली महापुरुष मंदिराचा २१ एप्रिलला वर्धापनदिन
सावंतवाडी
साटेली-खालचीवाडी येथील श्री महापुरुष मंदिराचा दुसरा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, २१ एप्रिलला संपन्न होणार आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होईल, त्यानंतर दुपारी १ वाजता आरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात येईल. सायंकाळी ६:३० वाजता 'अमृताभिषेक सातेली' निर्मित गायक सत्यनारायण कळगुटकर, गायिका ममता प्रभू, तबलावादक अक्षय कांबळी, कुणाल आवळे, पखवाज वादक संकेत भगत आणि संवादिनी वादक गजानन मेस्त्री यांचा अभंग, नाट्यगीत व भक्तीगीतांचा 'स्वरसंध्या' हा सुरेल कार्यक्रम सादर केला जाईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर करणार असून ध्वनीसंयोजन शैलेंद्र परब पाहणार आहेत. रात्री ९:३० वाजता चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार मंडळाचा 'कालसर्प तांडव' हा नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव महापुरुष कला, क्रीडा मंडळ व खालचीवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
konkansamwad 
