सावंतवाडी बांदा शहरातील उड्डाणपूलाचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण

सावंतवाडी
पत्रादेवी महामार्गावरील बांदा शहरातील नूतन उड्डाणपूलाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. माजी शालेय मंत्री आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन सौ. नीलमताई राणे, राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, माजी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, माजी सभापती शितल राऊळ, मानसी धुरी आदी उपस्थित होते.बांदा शहरातील वाढती वाहनांची संख्या पाहता कट्टा कॉर्नर येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली होती. सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने उड्डाणपुलासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. सावंतवाडीच्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनीकडून या सुबक व सुसज्ज उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी व अपघात टळणार आहेत.यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, जावेद खतीब, श्याम मांजरेकर, रत्नाकर आगलावे, रूपाली शिरसाट, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी सावंत, रेश्मा सावंत, श्रिया केसरकर, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, माजी उपसरपंच जयेश सावंत, भाजपा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, भाजपा उप तालुकाध्यक्ष शेखर गावकर, गुरुनाथ सावंत, शैलेश केसरकर, निलेश कदम, आनंद वसकर, विकी केरकर, दीपक सावंत, राजेश विरनोडकर, भैय्या गोवेकर, मधुकर देसाई, बाळा आकेरकर, माजी मंडल अध्यक्ष महेश धुरी, निलेश सावंत, शुभम साळगावकर, साई सावंत, राकेश केसरकर, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनचे प्रताप मूर्ती, महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता वृषाली पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.