क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त इन्सुली रमाईनगरात अभिवादन!
इन्सुली
भिमगर्जना युवक मंडळ व संघप्रभा,लक्ष्मीबाई आणि साक्षी महिला बचत गट इन्सुली, रमाईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्येाती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरात साजरी करण्यात आली.यावेळी विचार मंचावर महिला बचत गटाच्या रुपाली जाधव, संजना जाधव, दिपाली जाधव तसेच मंडळाचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बुध्दवंदनेने झाली.संजना जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेऊन आजच्या दिवसाचे महिलांसाठी असलेले महत्व विषद केले.तसेच कुमारी सुप्रिया व स्वप्नाली यांनी आजच्या दिवसाविषी मनोगते सादर केली.शेवटच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना धम्मचारी लोकदर्शी यांनी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्याकडुन शिकताना व मुलींसाठी शाळा सुरु केल्यानंतर सनातनी लेाकांकडून झेललेल्या यातना,आव्हानांचा उवापोह करुन आज ज्या महिला स्वतंत्र्, आत्मनिर्भर आहेत त्या केवळ सावित्रीबाईंमुळेच असल्याचे प्रांजळपणे सांगितले. तसेच फुले दांम्पत्यानी केलेल्या सतिप्रथा बंदी, केशवपन व बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह त्याचप्रमाणे अनाथालय, निराधार केंद्र, अस्पृषांसाठी सार्वजनिक पाणवठे निर्माण करण्यासाठी केलेल्या कार्याची महती सांगितली.या कार्यक्रमाची सांगता मिथिल जाधव यानी आभार मानून झाली.
या कार्यक्रमात मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, सदानंद जाधव, निलेश जाधव, दिपेश जाधव, तेजस जाधव, अजय जाधव, सविता जाधव, वृषाली जाधव, स्मिता जाधव, अनुजा जाधव, स्मृतिषा जाधव, शरयु जाधव, ललिता जाधव, सृष्टी जाधव, मिनल जाधव, अनघा जाधव, मयुरी जाधव, जयश्री जाधव, लैला जाधव ईत्यादींची उपस्थिती होती.

konkansamwad 
