श्री देव दाडोबा मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा १३ व १४ एप्रिलला

वेंगुर्ला
वेंगुर्ला खालचे अणसूर येथील श्री देव दाडोबा मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा १३ ते १४ एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यानिमित्त १२ रोजी सकाळी १० वाजता श्री देव दाडोबा प्रवेशद्वाराचे उद्घाटन, सायंकाळी ४ वाजता प्रायश्चित विधी, ५ वाजता स्थानिक महिलांच्या लेझिम पथकासह शिखर कलशाचे मिरवणूकीने आगमन, सायंकाळी ७.३० वाजता मंदिरात आरती, १३ रोजी सकाळी ७.३० ते १.३० पर्यंत गणपती पूजन, आरती, दुपारी २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक मंडळांची भजने, रात्रौ ८ वाजता कलेश्वर दशावतार (भाई कलिंगण) मंडळाचे नाटक, १४ रोजी सकाळी ७.३० वाजता मंगलाचरण, आवाहित देवता पूजन, सकाळी १०.५५ वाजता शिखर कलश प्रतिष्ठापना, शिखर कलश स्नपन होम, हरिहर या गांगभूत सुक्त, मंत्रपुष्पांजली, दुपारी २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिकांची भजने, रात्रौ ९ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री १० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, १५ रोजी सकाळी ७.३० ते १२.३० पर्यंत धार्मिक विधी, आरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ८ वाजता महिलांची फुगडी, रात्रौ ९ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहवे, असे आवाहन श्री देव दाडोबा ग्रामसमिती आणि श्री देव दाडोबा समितीतर्फे करण्यात आले आहे.