पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळेवाटप

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळेवाटप


परुळे

 

       मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, परुळे येथे रुग्णांना फळे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक रुग्णांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमास कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, बाजार समिती उपसभापती प्रसाद पाटकर, माजी सरपंच प्रकाश राणे, म्हापणचे माजी सरपंच नाथा मडवळ, भोगवेचे माजी सरपंच विजय पाटकर, कुशेवाडा उपसरपंच महादेव साफळे, विठोबा राणे, डॉ. अश्विनी माईनकर, डॉ. नीळकंठ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, आरोग्य कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. रुग्णसेवेला प्राधान्य देत अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारे ठरतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.