वेतोरेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर
वेतोरे
श्री देवी सातेरी मित्रमंडळ, वेतोरे यांच्यावतीने माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत साई योगेश्वरी हॉल, वेतोरे येथे हे आरोग्य शिबिर पार पडणार आहे.या शिबिरासाठी डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व लेसर सेंटर यांचे सहकार्य लाभले असून महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गतही सेवा देण्यात येणार आहेत. शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. राजेश्वर उबाळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. सौरभ पाटील, नेत्र तज्ञ डॉ. अनिरुद्ध तेली तसेच दंत तज्ञ डॉ. तन्वी दि. गोडकर हे तज्ज्ञ नागरिकांची तपासणी करणार आहेत.प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे. या आरोग्य शिबिरात विशेषतः मोफत नेत्र तपासणी व दातांची तपासणी केली जाणार असून, विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
konkansamwad 
