देवबाग समुद्र किनारपट्टीवरील जिओ ट्युब बंधाऱ्याचे काम पूर्ण ; आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी. आ. वैभव नाईक यांच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान.
मालवण.
आमदार वैभव नाईक यांनी काल गुरुवारी देवबाग समुद्र किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक जिओ ट्युब बंधाऱ्याची पाहणी केली. जिओ ट्युब बंधाऱ्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी अडीच कोटीचा निधी मंजूर केला होता.त्यानुसार जिओ ट्यूब बंधाऱ्याचे चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता समुद्र किनारपट्टीची धूप रोखली जात आहे. अनेकांनी धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्याची अनेक वेळा आश्वासने दिली मात्र आमदार वैभव नाईक यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले त्याबद्दल देवबाग ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
त्याचबरोबर देवबाग समुद्र किनारपट्टीवर आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ४ कोटीच्या धूप प्रतिबंधक दगडी बंधाऱ्याचे काम करण्यात येत आहे. पावसाळया नंतर पुढील काम पूर्ण केले जाणार आहे. त्याचाही आढावा आ. वैभव नाईक यांनी घेतला.त्याचबरोबर देवबाग खाडीकिनारी ८ कोटींचा बंधारा प्रस्तावीत आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर या कामाला देखील सुरुवात होणार आहे. देवबाग येथील उर्वरित बंधारा देखील लवकरच पूर्ण होईल असे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख सन्मेष परब, महिला तालुका संघटक दिपा शिंदे, उपविभाग प्रमुख अनिल केळुसकर,युवती सेना तालुका संघटक निनाक्षी शिंदे, हेमंत मोंडकर, शाखा प्रमुख रमेश कद्रेकर, शाखा प्रमुख अक्षय वालावलकर,शाखा प्रमुख मोहन कांदळगावकर, ग्रा. प. सदस्य फिलसू फर्नांडिस, सुप्रिया केळुसकर, मोरेश्वर धुरी, अण्णा केळुसकर, महेश सामंत सर, बबन माडये,योगेश सारंग,परेश सादये, दया टिकम, विलास वालावलकर,आनंद तारी, विशाल डोंगरे, निर्मला माडये, गणपत राऊळ आदींसह शिवसेना पदाधीकारी व शिवसैनिक उपस्थित होते.