राज्यभरात ८७२ शिवशाही बसेस उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात धावणार

मुंबई
राज्यातील परिवहन मंडळ मुलांच्या उन्हाळी सुटीसाठी सज्ज झाले आहे. एसटी महामंडळ राज्यभरात एकूण ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात धावणार आहेत. सुट्यांचा कालावधी व प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळाने पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात नजीकच्या काळात २६४० नवीन ‘लाल परी’ गाड्या दाखल होणार आहेत. दर महिन्याला ३०० गाड्या अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने नवीन एसी लाल परी प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार. राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वातानुकूलित बसेसकडे वळत आहेत. प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेत उन्हाळी सुट्टीत ८७२ शिवशाही बसेस प्रवासी सेवेत धावणार आहेत. जादा लाल परी गाड्या सोडण्याचेही नियोजन महामंडळाकडून केले गेले आहे.