मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी


वेंगुर्ला
     २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मदर तेरेसा स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शाळेमध्ये विविध फलकांवर महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची माहिती संकलित केली. शाळेतील विद्यार्थिनी कु. कॅरन फर्नांडिस, कु. ऋचा भगत यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रींच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली, तसेच कु. काव्या सामंत हिने स्वच्छतेचे जीवनातील महत्त्व सर्वांना पटवून दिले, काही मुलींनी गांधीजींचे आवडते भजन "वैष्णव जन" गायन केले. सहा. शिक्षिका सौ. निधी तांडेल यांनी गांधीजींच्या  महान कार्यावर प्रकाश टाकला व सत्य आणि अहिंसा मूल्याची माहिती दिली.
      या दिवशी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व समजावून घेऊन शाळा आवारातील साफसफाई केली .यावेळी शाळेचे  मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.