तळवणे श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी
तळवणे येथील श्री देवी माऊली मंदिरात २२ सप्टेंबर पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार २२ रोजी सकाळी ८ वाजता श्री देवी माऊलीचे विधीवत पूजन व घटस्थापना, रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धा यामध्ये सहभागी संघ -श्री देवी माऊली भजन मंडळ, सातोसे (बुवा-अमोल मांजरेकर,महेश शिरोडकर) लिंगेश्वर पावणाई भजन मंडळ,कणकवली(बुवा-योगेश मेस्री, विकास नाईक)जैन महालक्ष्मी भजन मंडळ,वालावल(बुवा -भूषण घाडी, दिपक मेस्री)श्री देवी माऊली भजन मंडळ, साटेली(बुवा-सत्यनारायण कळंगुटकर,प्रशांत मेस्री) सद्गगुरु भजन मंडळ,अणसूर(बुवा - हर्षल मेस्री,कौस्तुभ धुरी)श्री देव रवळनाथ भजन मंडळ,पिंगुळी (बुवा - रुपेश येमकर,गौरव धुरी)श्री देव काजरोबा भजन मंडळ,कवठणी ( बुवा - प्रदिप कवठणकर, शामसुंदर कवठणकर) मंगळवार २३ रोजी रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ,दांडेली आरोस यांचा नाट्य प्रयोग, बुधवार २४ रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांचा हळदीकूंकु कार्यक्रम,रात्री ८ वाजता श्री सातेरी भूमिका महादेव कासारवर्णे पेडणे गोवा यांचे समईनृत्य, रात्री ९ वाजता तालुकास्तरीय फुगडी ग्रुपची जुगलबंदी, गुरुवार २५ रोजी रात्री ९ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ,वालावल यांचा नाट्यप्रयोग, शुक्रवार २६ रोजी रात्री ८ वाजता तालुकास्तरीय दांडिया नृत्य,शनिवार २७ रोजी रात्री ९ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा नाट्य प्रयोग, रविवार २८ रोजी रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा सामना स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ, लोरे कणकवली बुवा-कु.रिया मेस्री (पखवाज- मिलींद लाड,तबला-भावेश लाड)विरुद्ध श्री गजानन भजन मंडळ,हुर्शी देवगड बुवा-साची मुळम(पखवाज-रितेश पांचाळ,तबला-रुपेश मुळम)यांच्यात सामना होणार आहे.सोमवार २९ रोजी सायंकाळी ४ वाजता गाव मर्यादित रांगोळी स्पर्धा,रात्री ८ वाजता रामकृष्ण हरि संगीत संस्कार गुरुकुल तेंडोली यांचा स्वरसंध्या कार्यक्रम, मंगळवार ३० रोजी सकाळी ८ वाजता शाळा नं १ येथे शारदोत्सव,बुधवार १ रोजी रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम,गुरुवार २ रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती तीर्थप्रसाद, महाप्रसाद,रात्री ८ वाजता वारकरी भजन,रात्री १० वाजता श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ,मळगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

konkansamwad 
