टार्गेट ठेऊन जास्तीत जास्त पदवीधरांची मतदार नोंदणी करा : वरुण सरदेसाई. कणकवलीत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी घेतली शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक.
कणकवली.
शिवसेना पक्षाने २०१८ साली प्रथमच कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करून थेट लढत दिली. त्यावेळी आपण मतदार नोंदणीत लक्ष घातले नव्हते तरी देखील फार कमी मतांच्या फरकाने आपला पराभव झाला होता. मात्र यावेळी आपल्याला या निवडणुकीत विजय खेचून आणायचा आहे त्यासाठी आपल्याला पदवीधरांची मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे.६ नोव्हेंबर पर्यंत आपल्याकडे वेळ आहे. शिवसेना युवासेना, महिला आघाडीच्या प्रत्येकाने एकत्रितरित्या या निवडणूकीत सहभागी होऊन टार्गेट ठेऊन जास्तीत जास्त पदवीधरांची मतदार नोंदणी करावी असे आवाहन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.
आगामी कोकण पदवीधर निवडणूकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी शनिवारी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचे कणकवलीत जोरदार स्वागत केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गीतेश राऊत, रुची राऊत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,मंगेश लोके, जयेश नर, कन्हैया पारकर, महिला तालुका प्रमुख वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, प्रदीप नारकर, निनाद देशपांडे, स्वप्नील धुरी,उत्तम लोके, गणेश गावकर, अतुल सरवटे, रूपेश आमडोस्कर,vतेजस राणे, धीरज मेस्त्री, नितेश भोगले, सिद्धेश राणे, सचिन आचरेकर आदिंसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.