म्हापण-खालचीवाडी येथील श्री देव दांडेकर मंदिराचा २३ ला वर्धापनदिन सोहळा.

म्हापण-खालचीवाडी येथील श्री देव दांडेकर मंदिराचा २३ ला वर्धापनदिन सोहळा.

 

कुडाळ 


     म्हापण खालचीवाडी येथील श्री देव दांडेकर मंदिराचा पंधरावा  वर्धापन दिन सोहळा २३ फ्रेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त २३ ला सकाळी ९ वा. अभिषेक, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १. वा. आरती, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. तिर्थप्रसाद, सायं. ४ वा. निवती महिला भजन मंडळ यांचे वारकरी भजन, सायं. ७ वा. श्री विठ्ठल-रखुमाई भजन मंडळ, मळई यांचे भजन, रात्रौ ९ वा. अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन श्री देव दांडेकर देवस्थान मंडळ व ग्रामस्थ, म्हापण यांनी केले आहे.