वेंगुर्ला शहरातील गवळीवाडा रस्ते कामाचा मनीष दळवींच्या हस्ते शुभारंभ
वेंगुर्ला
वेंगुर्ला शहरातील गवळीवाडा येथील रहिवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आले असून, या भागातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नगरसेवक शीतल आंगचेकर व प्रणव वायंगणकर यांनी या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर आज या कामाचा नारळ फुटला असून, यामुळे स्थानिक रहिवाशांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे. या प्रसंगी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुका अध्यक्ष व उपसरपंच पप्पू परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक शीतल आंगचेकर, प्रणव वायंगणकर, युवराज जाधव, सचिन शेट्ये, नगरसेविका सुषमा खानोलकर, रिया केरकर, आकांक्षा परब, कॉन्ट्रॅक्टर गणेश जाधव आणि परिसरातील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
