कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या नागरिकाला आमदार वैभव नाईक यांनी दिला आर्थिक मदतीचा हात.

मालवण
मालवण तालुक्यातील नांदोस येथील कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या चव्हाण यांना औषधोपचारासाठी आमदार वैभव नाईक यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. रावजी चव्हाण यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. आमदार वैभव नाईक यांना याबाबत समजताच चव्हाण कुटुंबीयाशी संपर्क साधत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.यावेळी चव्हाण कुटुंबीयांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
नांदोसचे माजी सरपंच अशोक नांदोसकर यांनी देखील चव्हाण यांना आर्थिक मदत दिली. यावेळी अशोक नांदोस्कर, प्रभाग अध्यक्ष श्री विजय गावडे, राजु गावडे, माजी सदस्य दिलीप हंजनकर, अॅड.हृदयनाथ चव्हाण, श्री शंकर चव्हाण, विजया नांदोस्कर यावेळी उपस्थित होते.