ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी संतोष पटकारे

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी संतोष पटकारे

  मुंबई

 

        संतोष महादेव पटकारे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.ही निवड महाराष्ट्र ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली आहे. ही निवड मुंबई चेंबूर येथील स्वामी विवेकानंद काॅलेज पटांगणात कै. भरत बोडेकर यांचे स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आली.याप्रसंगी राज्य संघटक विजय कोकरे, ऑल इंडिया धनगर गणेश गोरे, सुनील गोरे, परेश गोरे, मारुती झोरे, पांडुरंग काळे, मनोहर कोकरे, पांडुरंग गोरे, गणेश शेळके, संतोष खुटेकर, प्रकाश देसाई, संजय झोरे, संदीप झोरे इत्यादी उपस्थित होते. महाराष्ट्र समाज महासंघ नवलराज काळे, युवा आघाडीचे  कोकण प्रदेश अध्यक्ष संतोष पटकारे यांनी प्रत्येक वर्षी सामाजिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक वर्षी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांना मदत, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मदत करत असतात.अशा या सामाजिक नेतृत्वाला संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.