मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे कंटेनर पलटी

मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे कंटेनर पलटी

कुडाळ

 

   मुंबई-गोवा महामार्गावर  तेर्सेबांबर्डे येथे एका भरधाव कंटेनरला भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा कंटेनर दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन पलटी झाला. सुदैवाने, ज्यावेळी हा अपघात झाला त्या क्षणी समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंटेनर मुंबई-गोवा महामार्गावरून कुडाळच्या दिशेने जात होता. रात्री हा कंटेनर तेर्सेबांबर्डे परिसरात आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर वेगाने विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला असून कंटेनरचे किरकोळ नुकसान झाले आहे, मात्र रात्रीची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी होती, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.