इस्त्रायलचा लेबनानवर भीषण हल्ला. हिजबुल्लाह उद्धवस्त; ४९२ जणांचा मृत्यू.

जेरूसलेम.
इस्रायलने हिजबुल्लाह विरुद्ध विध्वंसक युद्धाची सुरुवात केली आहे. इस्रायलने लेबनानवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. हिजबुल्लाहवर भीषण हल्ल्यानंतर इस्त्रायलनं देशात इमरजेंसी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देशात स्पेशल होम फ्रंट सिच्युएशनची घोषणा आहे. ही स्थिती देशातील सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता असते तेव्हा दिली जाते. इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर अली कराकी ठार मारला गेला मात्र अधिकृतपणे त्याची पुष्टी झाली नाही.
याआधी सोमवारी इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्याने हिजबुल्लाह जवानांमध्ये हाहाकार माजला. दक्षिणी लेबनानमध्ये इस्त्रायलद्वारे केलेल्या हल्ल्यात ४९२ लोक मारले गेले तर १०२४ लोक जखमी आहेत. २१ मुले, ३९ महिलांसह जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि डॉक्टरांचा समावेश आहे. लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या जवळपास ३०० ठिकणांवर एकाचवेळी बॉम्ब डागले गेले. लेबनानमध्ये तातडीने लोकांना त्यांची घरे आणि इमारती सोडण्याचा इशारा देण्यात आला.
मी लेबनानच्या लोकांना सांगू इच्छितो की, इस्त्रायलची लढाई तुमच्याशी नाही. आम्ही हिजबुल्लाहशी लढत आहोत जे दिर्घकाळापासून तुम्हाला मानवी ढाल म्हणून वापरत आहेत. ते तुमच्या लिविंग रुममध्ये रॉकेट, गॅरेजमध्ये मिसाईल ठेवत आहेत. त्यातून ते आमच्या देशातील नागरिकांवर हल्ले करतायेत. त्यामुळे आमच्या सुरक्षेसाठी आता हे शस्त्र नष्ट करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हिजबुल्लाहपासून दूर राहा. आपापल्या सुरक्षित ठिकाणी जा असं आवाहन इस्त्रायली पंतप्रधानांनी लेबनानच्या नागरिकांना केले आहे.