वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आज ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आज ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर

वेंगुर्ला 


      महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या परिपत्रकानुसार दरवर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत १ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.तसेच नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृह येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ज्येष्ठांना एकत्र येऊन संवाद साधता यावा, मनोरंजनात्मक व सामाजिक उपक्रमात सहभागी होता यावे आणि त्यांचे शारीरिक-मानसिक आरोग्य सुदृढ राहावे हा या केंद्राचा उद्देश आहे.