कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने संत राऊळ महाराज महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने संत राऊळ महाराज महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

कुडाळ.

    कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून  दिनांक १६ ऑगस्ट रोजी संत राऊळ महाराज कॉलेज,  कुडाळ या महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, डॉ.ए.एन.लोखंडे, डॉ.एस. के.पवार गणित विभागप्रमुख, डॉ.एस.के.असोलकर मराठी विभागप्रमुख, प्रा. एस. जी. वालावलकर मराठी विभाग, डॉ. के.एम.चव्हाण इंग्रजी विभाग, कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत,समन्वयक समीर शिर्के ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
   कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रथमेश सावंत यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.प्राचार्य डॉ. ए.एन.लोखंडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  कोकण संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.स्मार्ट वॉच दिल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाच्या वेळी २६ गुणवंत विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच देण्यात आले.यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.