वेंगुर्लेत 'कचऱ्यातून कलाकृती' स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्लेत 'कचऱ्यातून कलाकृती' स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला

 

        स्वच्छता ही सेवा २०२६ व सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वामी विवेकानंद सभागृहात "कचऱ्यातून कलाकृती" स्पर्धा घेण्यात आली.सुमारे ३५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. टाकाऊ व पुनर्वापर योग्य साहित्यातून आकर्षक कलाकृती, सजावटीच्या वस्तू व पर्यावरणपूरक संदेश देणारी मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर केली.कचऱ्याचा पुनर्वापर, वर्गीकरण आणि संवर्धनाचा संदेश देत, कचरा ही विल्हेवाटीची बाब नसून तो योग्य वापराने संसाधन ठरू शकतो, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरण जागरूकता वाढण्यास मदत झाली.