वेंगुर्ले पत्रकार संदेश राऊळ यांच्या मातोश्री आशालता राऊळ यांचे निधन

वेंगुर्ले पत्रकार संदेश राऊळ यांच्या मातोश्री आशालता राऊळ यांचे निधन

वेंगुर्ले दि. २० 

 

    मठ-राऊळवाडी येथील रहिवासी व वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे सदस्य तथा राऊळ डिजिटल फोटो दुकानाचे मालक संदेश राऊळ यांच्या मातोश्री श्रीमती आशालता बाबाजी राऊळ (वय ८०) यांचे रविवार दि. २० सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात २ मुलगे, सुना, १ मुलगी, जावई, २ भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे.वेंगुर्ले पत्रकार संघाचे सदस्य संदेश राऊळ व फ्रीज मेकॅनिक संदीप राऊळ यांची ती आई, तर लोकमान्य मल्टीपर्पज कॉ-ऑपरेटिव्ह बँक वेंगुर्ला शाखेचे माजी शाखा व्यवस्थापक पुरुषोत्तम उर्फ दिलीप राऊळ व सामाजिक कार्यकर्ते बंडू राऊळ यांच्या त्या वहिनी होत.