लडाखमध्ये नदी पार करताना भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्याचा अपघात; ५ जवान शहीद.
नवीदिल्ली.
लडाखमध्ये एक दुर्घटना घडली आहे. दौलत बेग ओल्डी परिसरात टँक प्रशिक्षण सुरु असतानाच 5 भारतीय जवान नदीत वाहून गेले आहेत. पाच सैनिकांसह टी-72 टँक नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या पुरामुळे जवान नदीत बुडाले, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने जवान शहीद झाले आहेत. लडाखमधील नियंत्रण रेषेवर ही दुर्घटना घडली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 148 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिर मोरजवळ सकाळी 1 वाजण्याच्या सुमारास सराव सुरू असताना ही घटना घडली. घटनेच्या वेळी टँकमध्ये एक जेसीओ आणि चार जवानांसह पाच सैनिक होते. सर्व 5 जवान शहीद झाले आहेत, असं संरक्षण अधिकाऱ्यांनी घटनेनंतर सांगितलं. ही घटना रात्री एक वाजता घडली. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चुशुलपासून 148 किमी अंतरावर असलेल्या मंदिर मोरजवळ हा अपघात झाला. पीआरओ पीएस सिंधू यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, आम्ही वस्तुस्थिती तपासत आहोत.
शुक्रवारी दौलत बेग ओल्डी येथे टँक प्रशिक्षण सुरु होतं. यावेळी लष्कराचे अनेक टँक तिथे उपस्थित होते. यावेळी नियंत्रण रेषेजवळ टी-72 टँकच्या माध्यमातून नदी कशी पार करतात हे दाखवलं जात होतं. हे प्रशिक्षण सुरु असताना टँक नदीच्या पाण्यात गेला होता. यावेळी त्यात एक अधिकारी आणि 4 जवान होते. पण याचदरम्यान नदीचा प्रवाह अचानक वाढला आणि यामध्ये टँक वाहून गेला. यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. पण टँकमधील पाचही जण शही झाले आहेत. या सर्वांचे पार्थिव सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करुन दु:ख व्यक्त केलं.लडाखमध्ये नदी ओलांडताना झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आपल्या पाच शूर भारतीय सैन्याच्या जवानांना प्राण गमवावे लागल्याने अतिशय दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. देश खंबीरपणे उभा आहे. या दु:खाच्या काळात त्यांच्यासोबत आहे.