पोलिस पाटलांना नियमित मानधन द्या; पोलीस पाटील वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन.

पोलिस पाटलांना नियमित मानधन द्या; पोलीस पाटील वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन.
पोलिस पाटलांना नियमित मानधन द्या; पोलीस पाटील वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन.

सिंधुदुर्ग.

   गांव कामगार पोलिस पाटील हे शासनाच्या महसूल विभाग व पोलिस विभाग व जनता यामधील दुवा म्हणून अत्यंत तुटपुंज्या मानधनात काम करत असतो. पोलिस पाटलांचे मासिक मानधन रु. ६५००/- असून सध्याच्या सरकारने  दिनांक १५/०३/२०२४ ने ८५००/- ची वाढ करुन रु. १५०००/- (मासिक) केलेले आहे. परंतु सदरचे मानधन हे वेळेवर होत नसून सध्या माहे मार्च २०२४ पासूनचे मानधन अद्यापपर्यंत मिळालेले नाही. तरी सदरचे मानधन त्वरीत व नियमीत मिळण्याबाबत आपल्या स्तरावरुन कार्यवाही व्हावी तसेच सदर मानधनाची सविस्तर स्लिप इतरांप्रमाणे आम्हाला मिळावी अश्या विविध मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांना पोलीस पाटील वेंगुर्ला तालुकाच्या वतीने देण्यात आले.
    गाव कामगार पोलिस पाटील हे शासन व्यवस्थेचा ग्रामस्तरावरील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पोलिस पाटलांना पोलिस यंत्रणेसोबत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. महसूल विभागासंबंधीत अनेक कामे पोलिस पाटलांकडे दिली जातात.न्याय व्यवस्थेलाही पोलिस पाटील सहकार्य करीत असतात. तसेच ग्रामपंचायत, वन विभाग, बांधकाम, कृषि विभाग, विद्युत वितरण कंपनी, निवडणूक आयोग इत्यादि यंत्रणा त्यांच्या कार्यात पोलिस पाटीलांचे सक्रीय सहकार्य घेत असतात. असे असूनही दिवसरात्र राबणाऱ्या पोलिस पाटलांना दिले जाणारे मानधान हे अत्यंत तुटपुंजे असे आहे. व ते सुध्दा नियमीतपणे प्राप्त न होऊ शकल्याने पोलिस पाटलांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निमार्ण झालेला आहे. मागील चार महिन्यांचे मानधन थकीत राहिलेले आहे. ते लवकरात लवकर द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.फौज/पोलीस पाटील 'भरती/पात्र यादी/१२/२०२३ दिनांक २९१२/ २०२३ च्या पत्राप्रमाणे नवीन पोलिस पाटील यांना लवकरात लवकर नेमणुक पत्र देऊन भरती करावी. त्यामुळे इतर अतिरिक्त कार्यभार असलेल्या पोलिस पाटीलांवरील ताण कमी होईल.तरी आमच्या या निवेदनाची दखल घेऊन मागील चार महीन्यांचे राहीलेले मानधन त्वरीत आदा करावे. तसेच यापुढील मानधनाची ग्रैंड (निधी) वेळच्या वेळी मिळेल याबाबत तजविज करावी. आणि दिलेल्या मानधनाची स्लीप आम्हाला देण्यात यावी.अशी मागणी पोलीस पाटील वेंगुर्ला तालुकाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
   यावेळी पोलीस पाटील शिरोडा लक्ष्मण तांडेल, पोलीस पाटील आजगाव निकिता पोखरे, पोलीस पाटील आसोली निलेश पोळजी, पोलीस पाटील तुळस रुतिक नाईक, पोलीस पाटील अश्विनी खवणेकर, पोलीस पाटील उभादांडा विजय नार्वेकर, पोलीस पाटील आडेली संजना होडवडेकर, पोलीस पाटील खानोली धोंडू खानोलकर, पोलीस पाटील दाभोली जनार्दन पेडणेकर आदी उपस्थित होते.