उद्या वेंगुर्ला भाजपाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्ताने योग शिबिराचे आयोजन.
वेंगुर्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘२१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिन’ देशभरातील जनतेस विविध शिबीरात सहभागी होऊन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.पंतप्रधान २१ जुन रोजी श्रीनगर येथे स्वत: योग शिबीरात उपस्थित राहणार असून देश - विदेशातील करोडो जनतेस स्वस्थ जिवन जगण्याची प्रेरणा व संदेश देणार आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांनी या कार्यक्रमासाठी प्रदेश संयोजक विश्वास पाठक व सहसंयोजक श्वेता शालिनी यांची निवड करुन संपुर्ण महाराष्ट्रात योग दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
भाजपा म्हणून प्रत्येक तालुक्यात योग शिबीराचे आयोजन करावे तसेच सर्व मोर्चा व प्रकोष्ठ ने जिल्हा स्तरावर एक योग शिबीर आयोजित करावे याव्यतिरिक्त सार्वजनिक कार्यक्रम - शिक्षण संस्था, अन्य सामाजिक संस्थातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधीं सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
भाजपा वेंगुर्ला तालुका कार्यालयात या संदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून मा. नगराध्यक्ष राजन गिरप व सहसंयोजक म्हणून अँड.सुषमा खानोलकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.तसेच तालुकास्तरावर वेंगुर्ले कॅम्प मैदानावरील तालुका क्रिडा केंद्रातील नवीन बॅडमिंटन हाॅल मध्ये दिनांक २१ जुन रोजी सकाळी ७:०० ते ८: ०० या वेळेत योग शिबीर घेण्याचे ठरविण्यात आले.
या शिबीरात भाजपा कार्यकर्त्यां सोबत खेळाडु, डाॅक्टर, वकिल, प्राध्यापक, शिक्षक, विविध संस्थांचे प्रतिनीधी सहभागी होणार आहेत.भाजपा तालुका कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड.सुषमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, महीला अध्यक्षा सुजाता पडवळ, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, महीला मोर्चाच्या श्रेया मयेकर - वृंदा मोर्डेकर - उर्वी गावडे, नगरसेवक प्रशांत आपटे, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर, छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते.