रत्नागिरीत लवकरच नमन महोत्सव सुरू करणार : पालकमंत्री उदय सामंत. हातखंबा येथे 'सन्मान लोककलावंतांचा' कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

रत्नागिरीत लवकरच नमन महोत्सव सुरू करणार : पालकमंत्री उदय सामंत.   हातखंबा येथे 'सन्मान लोककलावंतांचा' कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

रत्नागिरी.

  रत्नागिरी हातखंबा येथे उदय सामंत प्रतिष्ठान आणि नमन लोककला रत्नागिरी जिल्हा (रजि.) तालुका शाखा रत्नागिरी, कोकण नमन कलामंच रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 'सन्मान लोककलावंतांचा' या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली.
   पूर्वीपासून चालत आलेली कोकणची संस्कृती आजही या नमन, जाखडी, भजन कलेच्या माध्यमातून जपली जात आहे. या लोककलावंतांमुळे आपली संस्कृती आजही जिवंत आहे. त्याच कोकणच्या लोककलावंतांचा सन्मान करणे म्हणजे आपल्या मूळांचा सन्मान करणे होय. यावेळी लोककलेला राजाश्रय देण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करत आहे. या वर्षी देखील अनेक लोककलावंतांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कलावंतांचा आशीर्वाद माझ्यासाठी भाग्याचं आहे, तसेच रत्नागिरीत लवकरच नमन महोत्सव सुरू करणार असल्याचं यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. याप्रसंगी कोकण नमन कलामंचचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, संस्थापक श्रीधर खापरे, श्री. शांताराम मालप, श्री. युयुत्सू आर्ते, खजिनदार सुरेश येजरे, देवरुखचे उपसभापती श्री. थेले, तहसीलदार श्री. म्हात्रे, गटविकास अधिकारी श्री. जाधव यांसह मोठ्या संख्येने नमनप्रेमी उपस्थित होते.