गोवा बनावटीच्या चोरट्या दारूच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. तब्बल १७ लाख ४९ हजार २२० रुपयाचा मुद्देमाल जप्त; एक जण ताब्यात.
सावंतवाडी.
गोव्याहुन नाशिकला गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातुक होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्याने आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, विजय सूर्यवंशी, संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनिल चव्हाण विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर विजय चिंचाळकर, प्र.अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग वैभव वैद्य, यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार बांदा-वाफोली रोड, डोंगरीकर हॉटेलजवळ, वाफोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे महिंद्रा कंपनीचे सफेद रंगाचे बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र. MH-48-CB-3259 सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रिकामे प्लॅस्टिकचे कॅरेट व खराब नारळाचे शहाळ्यांखाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 150 बॉक्स व बिअरचे 08 बॉक्स अवैध साठा मिळून आला. आरोपी इसम आंबादास पोपट आहिरे ऊर्फ आंबादासभाई पोपटभाई आहिरे, वय 40 वर्षे, रा. 687, दहिवड, ता. देवळा, जि. नाशिक- 423102 यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ग्रामध्ये अं. रु.8,64,000/- किंमतीचे मद्य व अं. रु.30,720/- किंमतीची बिअर तसेच रु.8,50,000/- किंमतीचे चारचाकी वाहन व मद्य / बिअर साठा लपविण्यासाठी वापरलेले रु. 4500/- रु. किंमतीचे 30 प्लॅस्टिकचे रिकामे कॅरेट तसेच 700 खराब नारळाचे शहाळे असा एकुण अं. रु.17,49,220/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर कारवाई प्र. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग वैभव वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली संजय मोहिते, निरीक्षक, रा.उ.शु. कुडाळ अमित पाडळकर, श्री. तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक, प्रदीप रास्कर, स.दु नि गोपाळ राणे, जवान प्रसाद माळी व जवान नि. वाहन चालक रणजीत शिंदे, यांनी केली.सदर प्रकरणी पुढील तपास निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली श्री. संजय मोहिते है करीत आहेत.