मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न.

पंढरपूर.

   आषाढी वारी निमित्त आजषअवघे पंढरपूर दुमदुमले आहे. लाखोच्या संख्येने वारकरी हे पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. यानिमित्त दरवर्षी प्रमाणे पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. पंढरपुरात वैष्णवांचा भीमकाय महासागर लोटला आहे. जागो जागी वारकरी विठ्ठलाची आराधना करतांना दिसत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांचे संकट दूर कर. चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे, अशी प्रार्थना केली.
    आषाढी एकादशीनिमित्त यंदा विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पुजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. आज पहाटे त्यांच्या हस्ते शासकीय पूजा पर पडली, तर नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी असून गेल्या १६ वर्षांपासून हे दाम्पत्य अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत आहे.
   आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात तब्बल २० लाख वारकरी दाखल झाले आहेत. ही विक्रमी गर्दी आहे. चंद्रभागेच्या तिरावर स्नानासाठी देखील पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी रुक्मिणी मातेची पूजा केली. यावेळी मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्य यांनी देखील पूजा केली. यावेळी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रसाद म्हणून शिंदेंना श्रीफळ, तुळशी हार आणि विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा शिंदे यांना देण्यात आली.
   पूजा झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणले, राज्यातील वारकरी, शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, पिक चांगले येऊ दे, बळीराजाला सुखी-समाधानी राहू दे, असे साकडे एकनाथ शिंदे यांनी देवाच्या चरणी केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यंदा पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून दर्शनाला येणाऱ्यांची संख्या देखील वाढिली आहे. राज्यातील कष्टकरी, शेतकरी व प्रत्येक घटकाला चांगले आणि सुगीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना देखील शिंदे यांनी यावेळी केली.