खर्डेकर महाविद्यालयाच्या दोन एन.सी.सी.कॅडेट्सची भारतीय सैन्यात निवड. निवड झालेल्या कॅडेट्सचे महाविद्यालयाच्या वतीने सत्कार.
वेंगुर्ला.
येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटचे कॅडेट्स श्रीराम संतोष गावडे आणि निकिता राजेंद्र निनावे यांचे भारतीय सैन्याच्या अनुक्रमे आर्मी व नौदलात निवड झाल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.प्राचार्यांनी एन.सी.सी.कॅडेट्सच्या या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाच्या यशामध्ये भर घातल्यामुळे आनंदही व्यक्त केला.
सदर सत्कार समारंभासाठी महाविद्यालयाचे सल्लागार समितीचे चेरमन डी.आर.राणे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एम.एम.मुजुमदार,हिंदी विभागप्रमुख व्ही.पी.नंदगिरीकर,तत्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.सुनील भिसे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख एल.बी.नैताम व मराठी विभागप्रमुख एस.जी चुकेवाड यांनी उपस्थित राहून या यशस्वी कॅडेट्सचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभाचे प्रस्ताविक एन.सी.सी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.बी.जी.गायकवाड यांनी केले तर आभार कॅडेट रुपाली दाभोलकर यांनी मानले.यशस्वी कॅडेट्स श्रीराम संतोष गावडे आणि निकिता राजेंद्र निनावे यांनी महाविद्यालयाने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल व या सत्काराबद्दल आभार मानून उपस्थित सर्व एन.सी.सी कॅडेटसना एन.सी.सी.चे महत्व सांगितले.