नितेश राणे यांची रायगड दक्षिण भाजप जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती
कणकवली
सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांची भाजपच्या रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या नव्या जिल्हा प्रभारींच्या यादीत नितेश राणे यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नितेश राणे यांच्या निवडीमुळे रायगड जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार आहे. या नियुक्तीनंतर त्यांचे राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.
konkansamwad 
